-
तुझ्याशीच बोलतेय मी
0३०-३५ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि शांभवी यांचे पती श्री. जयराम हर्डीकर यांचे अपघाती निधन झाले. प्रेमाचा डाव नुकताच कुठे रंगायला लागला होता. दोन गोजिरवाण्या मुलींनी जयराम आणि शांभवी यांचे कुटुंब साकारले होते. एकसंध असे हे कुटुंब एका क्षणात विसकटून गेले. शांभवीला खरेच वाटेना की, आपला निरोप घेऊन गेलेले जयराम आता परत कधीच परतणार नाहीत. पण म्हणतात ना, ‘बाईचे पहिले प्रेम कधीच संपत नाही.’ शांभवी सगळे सोपस्कार पूर्ण करीत, आपली कर्तव्ये पाळीत जगत राहिली. पण प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता जयराम.
-
ते दोन क्षणसुद्धा
0‘मी गौरी!! आयुष्यातील पहिली बारा वर्ष माझ्या गावात/घरात राहून आज मी मुंबईला आले आहे. थोडीशी भिती आणि खूपशी स्वप्न घेऊन! मला तुमच्याशी काहीसं बोलायचंय!’ गौरी आनंद पाटील यांच्या पुस्तकाची ही अर्पणपत्रिका खूप काही सांगून जाते. एका मनस्वी मुलीशी ओळख होते.
तिचे लेखन पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले असले, तरी ते पहायला ती या जगात नाही. तिने लिहिलेल्या तिच्या डायरीची ही पाने आहेत. ‘आयुष्य सुंदर आहे, आणि मी ते अजून सुंदर बनविणार,’ हा विचार घेऊनच तिने तिच्या वाट्याला आलेले अल्प आयुष्य सुंदर केले. या वाटचालीत तिला भेटलेली माणसे आणि पुस्तके, तिच्या मनात आलेले विचार तिने शब्दबद्ध केले आहेत.
-
दिगंतराची धून
0हे जगणे सुंदर, तरिही भासे न्यून
प्राणांत लहरते दिगंतराची धून
मी इथे भोगते देहपणाचे सौख्य
पण पैलथडीचे लोभवते मज दुःख…प्रतिभा संपन्न कवयित्री आश्लेषा महाजन ह्यांच्या अनेक दर्जेदार मुक्तकांपैकी हे एक आशय संपन्न मुक्तक आहे. मुक्तकांचे मिताक्षरी वळण कवयित्रीच्या सलग दीर्घचिंतनाचा परीघ विस्तारत नेते. मुक्तकांच्या आशय सूत्रातून केंद्रभागी असणारे व्यामिश्र जीवन, बदलता भोवताल, प्रेमातील प्रेयस अनुभूतीच्या विविध भावछटा कवयित्रीने फार सुंदररीत्या अधोरेखित केल्या आहेत.
-
दुस्तर अफगाणिस्तान
0ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स म्हणजेच साम्राज्यांची दफनभूमी म्हणून ख्यात असलेल्या अफगाणिस्तानचा प्रदीर्घ इतिहास मोठा उलथापालथीचा आणि जटिल आहे. अफगाणिस्तानचं गेल्या शतकभराचं राजकारण प्रक्षुब्ध आणि रक्तरंजित राहिलं आहे. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालखंडातल्या अफगाणिस्तानातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून प्रस्तुतच पुस्तक दुस्तर अफगाणिस्तान म्हणजे गेल्या शंभर- सव्वाशे वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून – घटना आणि संकल्पना या दोहोंतून घेतलेला वेध आहे.
-
नरेंद्र मोदी – जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा सर्जक
0देशाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या कालबाह्य आणि अकार्यक्षम व्यवस्थांचा डोंगर हटवून नरेंद्र मोदी यांनी राजकीय – औद्योगिक – आर्थिक – सामाजिक वर्तमानाला नवा वेगवान चेहरा दिला; हे त्यांनी कसे सध्या केले ? मोदींच्या नेतृत्वशैलीची वैशिष्ट्ये, गुणविशेष, त्यांनी अंगिकारलेली मूल्ये आणि प्रशासनाच्या रुक्ष व्यवस्थेला त्यांनी दिलेली मानवी भावभावनांची, करुणेची किनार या सगळ्या गोष्टींची काही व्याख्या करता येईल का ? कशी ? – हे पुस्तक म्हणजे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत केलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रवास आहे.
-
पेंच : मोगली आणि जंगलबुकचं अरण्य
0लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रुडयार्ड किपलिंग लिखित ‘जंगलबुक’ पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी आहे. इथे आजही मोगलीचे सवंगडी शेरखान, भालू, कबाकी, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. अतुल धामणकर यांच्या अनेक थरारक अरण्य अनुभवांनी आणि ओघवत्या शैलीतील लेखनाने नटलेलं हे एका जंगलाचं जणू आत्मचरित्रच आहे.
-
मळभ कोरोनाचे
0‘मळभ कोरोनाचे’ हे पुस्तक अनुभवावर आधारलेले आहे. मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, सिंधुदुर्ग (देवगड) या भागात काम करता आले. त्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे. त्याचबरोबर गाठीशी असलेला अनुभव, इंटरनेट माध्यम, वर्तमानपत्रे (देशी / विदेशी) अहवाल याचा अभ्यास करून आपल्यासमोर ‘मळभ कोरोनाचे’ पुस्तक आणले आहे, प्रत्यक्ष माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी.
-
महासत्तांतर
0महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर कल्पनातीत फासे टाकले गेले. त्यातून एक अपूर्व महासत्तांतर घडलं. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मोदी – शाह या भाजप नेत्यांच्या आशीर्वादानं त्याच खुर्चीवर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे विराजमान झाले. हा उठाव फसला असता तर ही धुमश्चक्री संपल्यावर इतरांच्या हितासाठी स्वतःला संपवण्याचा एकमेव पर्याय एकनाथ शिंदेंकडे होता. पडद्यामागच्या या आणि अश्या असंख्य अज्ञात नोंदींची ही अस्सल बखर.
महासत्तांतराच्या थेट परिघावर उभं राहून आतल्या-बाहेरच्या घडामोडी पाहणाऱ्या एका सजग आणि चतुर पत्रकारानं दाखवलेली मती गुंग करून टाकणारी सत्तानाट्याची अंतस्थ संहिता.
वास्तव आणि एखाद्या वेब मालिकेसारखी थरारक…
-
माझा मृत्युंजय
0मूत्रपिंडासारख्या दुर्धर आजाराशी प्रामाणिकपणे एक शूर लढवय्या वीराप्रमाणे लढून त्यावर मृत्युंजय मिळवून एक प्रदीर्घ जीवन जगणार्या माणसाची कथा.
-
माझी राजकीय मुशाफिरी
0श्री. अरुण साठे यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एल. एल. बी. पदवी मिळवली. ते मुंबई उच्च न्यायालयाचे नियुक्त वरिष्ठ वकील आहेत, आणि विविध सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय आहेत. लेखकाने पन्नास वर्षांच्या कालावधीत लढवलेले लढे, केलेले सामाजिक कार्य आणि त्या सर्वांविषयीची त्यांची मते, दृष्टिकोन या पुस्तकात व्यक्त झाला आहे. हे त्यांचे आत्मचरित्र नाही तर राजकारणासह अनेक राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचा घेतलेला हा आढावा आहे. लेखकाचे अनुभव, त्यांचे विचार आणि विविध राजकीय नेत्यांविषयीचे अनेक प्रसंग वाचकांना आवडतील आणि तरुण वाचकांना विचारप्रवृत्त करतील असे आहेत.
-
मार्गस्थ
0अभिव्यक्ती हा समान धागा १४ विद्या ६४ कला असतो, तसेच अभिनयापासून लेखनापर्यंत कोणत्याही माध्यमातून व्यक्त होता येते अशी ही उत्स्फूर्त आणि प्रबळ उर्मीच असते. साहित्य निर्मितीत डोकावणं हा सर्जनशील माणसानं आपलेच संदर्भ तपासून पाहण्याचा एक प्रकार असतो. ‘डॉ. गुरुनाथ पंडित’ यांनी आपलं आयुष्य, आपला भवताल आणि भाषेपासून संवेदना पर्यंत झालेले संस्कार या साऱ्यांचे संदर्भ तपासून पाहून जगण्यात डोकावण्यासाठी केलेली कृती म्हणजेच ‘मार्गस्थ’ ही त्यांची साहित्यकृती.
-
मी सारथी अग्निरथाचा
0‘मी सारथी अग्निरथाचा’ हे मराठी भाषेतील रेल्वे इंजिनाच्या (वाफेच्या इंजिनाच्या) चालकाला मध्यवर्ती पात्र अशी संकल्पना करून केलेले लेखन. या पुस्तकातील पात्रे खरीखुरी आहेत. त्यांचे अनुभव जिवंत आहेत. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांच्या आधारे हे लेखन केलेले आहे. रेल्वे इंजिन ड्रायव्हरच्या चित्तथरारक कथांचा संग्रह.