पुस्तक प्रकाशन सोहळा
शिवछत्रपतींचे दुर्गस्थापत्य | Fort Architecture of Chhatrapati Shivaji
- रविवार, २० ऑक्टोबर २०२४
- सायंकाळी ०५.३० वाजता
- नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, ८१२, शिवाजीनगर, चिपळूणकर मार्ग, (विधी महाविद्यालय मार्ग) ४११००४ पुणे.
शिवछत्रपतींच्या दुर्गांचे परिपूर्ण दृष्य, त्यांची भव्यता, वैभव, भक्कम संरक्षण क्षमता, इतिहास, स्थापत्यकला, बांधणीची विविधता अशा विषयांचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला उपयुक्त ग्रंथ. स्वराज्यातील दुर्गांबरोबर इतर राजवटीतील दुर्गांच्या स्थापत्याचे अस्सल साधनांच्या आधारे डॉ. केदार फाळके यांनी केलेले सखोल संशोधन. स्वराज्याच्या दोन राजधान्यांचा आणि राजधानीच्या स्थलांतराचा घेतलेला आढावा. दुर्गांच्या संवर्धनाकरिता उपयुक्त उदाहरणे म्हणून जागतिक वारसास्थळांची केलेली चर्चा.
लेखक : डॉ. केदार फाळके
अध्यक्ष : श्री. प्रदीप रावत
मुख्य अतिथी : श्री. विजय कुवळेकर
प्रमुख पाहुणे : श्री. अरुण जोशी
कार्यक्रमाची रूपरेषा
०५.३० ते ०५.५० | चहापान
०६.०० ते ०६.१० | स्वागत : आनंद लिमये
०६.१० ते ०६.३० | मनोगत :डॉ. केदार फाळके
०६.३० ते ०६.४० | प्रकाशन समारंभ : हस्ते श्री. अरुण जोशी
०६.४० ते ०७.०० | श्री. विजय कुवळेकर
०७.०० ते ०७.२० | श्री. अरुण जोशी
०७.२० ते ०७.३५ | अध्यक्षीय भाषण : श्री. प्रदीप रावत
०७.३५ ते ०७.४० | आभार प्रदर्शन