घटना – प्रसंग तसे साधे …
नेहमीच्याच जीवनातले …
आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही…
पण तेच सारं सुरेश खरे यांच्या मिश्किल, हसऱ्या, उपरोधिक, व्यंगभेदक नजरेतून वेगळं रुप घेतं. सुलू, तात्या, नाना, बंटी अशा विविध पात्रांच्या संवादांतून, प्रतिक्रियांमधून व्यक्त होतं.
वाचल्यावर आपल्या मनात उमटतं, ‘अरे, हेच तर माझ्या मनात होतं… ‘ किंवा ‘अगदी खरं आहे, असंच असतं हे’ अथवा ‘असंही असत नाही !’ हे खरे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. हे लेखन आपल्याला गुदगुल्या करतं. सुखद हसवत… निखळ आनंद देतानाच अंतर्मुखही करतं… विचार करायला लावतं… म्हणूनच हे ‘हसरे बाण’ जिव्हारी लागत नाहीत, जिव्हाळ्याचे होतात…