-
मुसलमानी मुलखांतील मुशाफरी
0१९३१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मुसलमानी मुलखातली मुशाफरी या पुस्तकाचं १९५० मध्ये पुनर्मुद्रण झालं. श्री. रा. टिकेकर डिसेंबर १९२८ ते जुलै १९२९ या काळात पाच-सहा महिने पुण्याच्या ‘केसरी’चे प्रवासी प्रतिनिधी म्हणून मुसलमानी मुलखात फिरत होते. या मुशाफरीत समाविष्ट आहेत पेशावर आणि क्वेट्टा; इराकमधील बसरा आणि बगदाद तर इराणमधील आबादान आणि तेहरान. मुसलमानी मुलखातील मुशाफरी केवळ प्रवासवर्णन नसून ऐतिहासिक-सामाजिक दस्तावेजच आहे. आज हे पुस्तक दुर्मीळ आहे. म्हणूनच नवीन आवृत्तीचा प्रपंच.
-
यांनी इतिहास घडविला
0इतिहास घडविणारा महापुरुष हा त्याच्या कालखंडातील सामाजिक परिवर्तनाचा परिणाम असतो. तो आपल्या कालखंडात आपल्या विचारांस धरून परिस्थितीप्रमाणे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. अशा इतिहास घडविणार्या राष्ट्रीय नेत्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे.
- लाला लजपतराय
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- चित्तरंजन दास
- महात्मा गांधी
- मोहम्मदअली जीना
-
वाढत्या वयात चिरतरुण राहण्याची कला
0डॉ. पी. एस. रामाणींची जॉगिंग, गिर्यारोहणाची आवड आजही कमी झालेली नाही. त्यांना लेखन करायला खूप आवडते आणि हे त्यांचे प्रकाशित झालेले ७९ वे पुस्तक आहे. त्यांना संगीताची आवड आहे आणि लहानपणी संगीताच्या संदर्भात त्यांना जे करता आले नाही ते आता करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याआधीच ते तबलावादनाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाले असून तिसऱ्या परीक्षेची तयारी करत आहेत. इतकेच नाही तर सामाजिक कार्यातीलदेखील त्यांची आवड कमी झालेली नाही. ‘शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी माणसाने सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि औदार्याने जगले पाहिजे’ असे त्यांचे मत आहे.
-
वास्तव कुपोषणाचे
0हे पुस्तक लिहिण्याचा विचार मनात का आला?
मेळघाट, पालघर, ठाणे ग्रामीण, पेठ, सुरगणा, अकलकुवा, धडगाव या भागातील आदिवासी जनतेच्या जीवनाचे ‘वास्तव’ समोर आणण्यासाठी मान. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मा. उद्धवसाहेब यांनी या भागात काम करण्यासाठी प्रेरणा दिली म्हणूनच हे सर्व मांडू शकलो. मृत्यू अटळ आहे. शासकीय योजनाही आहेत; पण मृत्यू रोखण्यासाठी कुठे कमी पडतात ते वास्तव मांडण्यासाठी हे लेखन!
-
विरंगुळा
0‘जय स्वावलंबन’ हा आईचा कानमंत्र होता. कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये; आपल्याला काम येत असेल तर मदत नी सही सावध असतात आणि आपणही त्यांच्यावर अवलंबून नसतो हे तिचे साधेसुधे तत्त्व होते. अनेकांच्या पत्रिका पाहणे, जुळवणे, संकटप्रसंगी त्यांना मानसिक आधार देणे, यात माझ्या वडिलांचे तिला संपूर्ण सहकार्य होते. याचबरोबर कीर्तन करणे, चतुर्मासांत प्रवचने करणे, गप्पा मारता मारता एकीकडे स्वेटर विणणे, बाळंतविडे, कापडी- कागदी फुले बनवणे हे असे अनेक किरकोळ वाटणारे, पण खटाटोपी उद्योग ती निरलसपणे करीत असे. यातून मिळालेले सारे मानधन ती सेवाभावी संस्थांना देत होती. स्वतःपेक्षा दुसर्यांचे हित तिने कायम पाहिले व जपलेही.
-
शबल खंड्याचं विश्व
0शबल खंड्या (Pied kingfisher) याच्या बद्दल विणीच्या सखोल अभ्यासाची वानवा आहे. परदेशात शबल खंड्यावर अनेक अभ्यास झालेत. त्यांतील काही बाबी लेखकाला त्याच्या अभ्यासा दरम्यान दिसून आल्या. त्या त्यांनी फोटों सकट घेतल्यामुळे हे पुस्तक फारच रंजक झाले आहे.
-
शिवछत्रपतींचे दुर्गस्थापत्य
0शिवछत्रपतींच्या दुर्गांचे परिपूर्ण दृष्य, त्यांची भव्यता, वैभव, भक्कम संरक्षण क्षमता, इतिहास, स्थापत्यकला, बांधणीची विविधता अशा विषयांचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला उपयुक्त ग्रंथ. स्वराज्यातील दुर्गांबरोबर इतर राजवटीतील दुर्गांच्या स्थापत्याचे अस्सल साधनांच्या आधारे डॉ. केदार फाळके यांनी केलेले सखोल संशोधन. स्वराज्याच्या दोन राजधान्यांचा आणि राजधानीच्या स्थलांतराचा घेतलेला आढावा. दुर्गांच्या संवर्धनाकरिता उपयुक्त उदाहरणे म्हणून जागतिक वारसास्थळांची केलेली चर्चा.
-
शेखर अन् वैभवशाली मधली गल्ली
0डॉक्टर मधुकर बी. राऊत मार्ग, शिवाजी पार्क येथील मधली गल्ली. ह्या गल्लीला ‘वैभवशाली गल्ली’ म्हणण्याचे एकमेव कारण म्हणजे ह्या गल्लीतील एकापेक्षा एक अनमोल हिरे म्हणजेच ह्या गल्लीत राहून गेलेले किंवा अजूनही वास्तव्यात असलेले समाजातल्या विविध क्षेत्रांतील नावारूपाला आलेली असामान्य व्यक्तिमत्त्व की ज्यांच्या सान्निध्याने, संस्कारांमुळे, आचाराने, विचाराने पुढील अनेक पिढ्या घडल्या.
-
शेखरची प्रभा अन वल्ली
0‘शेखरची प्रभावळ’ ह्या लेखसंग्रहाप्रमाणेच हा लेखसंग्रह प्रकाशित करण्याच्या उद्देश अर्थार्जन नसून येणाऱ्या सर्व रकमेतून कर्करोगपीडितांना मदत करण्याचा आहे. ‘शेखरची प्रभा अन वल्ली’ या लेखसंग्रहात एकूण ५० लेख आहेत. यात परिचयाच्या व जवळच्या मंडळींची व्यक्तिचित्रणे आहेत, युगपुरुषांच्या भेटीत आलेल्या सुखद आठवणी आहेत, लेख अनुभवांवर आणि आठवणींवर आधारित आहेत.
-
शेखरची प्रभावळ
0लेखकाने त्याचा शिवाजी पार्कचा परिसर, डॉक्टर एम. बी. राऊत रोड, बालमोहन विद्यामंदिर तसेच जवळपासची खाद्यगृहे आणि लहानपणापासून त्याच्या संपर्कात आलेल्या आदर्श व्यक्ती, गल्लीतील लहानपणाची धमाल, फेरीवाले, विक्रेते ह्यांचे व्यक्तिचित्रण, जुन्या म्हणजेच १९६२-१९९० या कालखंडातील आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश्य जुन्या आठवणी पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात हा असून पुस्तक विक्रीतून जमा होणारा पैसा हा कर्करोगावर संशोधन करणार्या व्यक्ती किंवा संस्था आणि कर्करोगपीडितांना देण्याचा मानस आहे.
-
सखी सूत्र
0इतके वर्षं एक कार्यकर्ती या नात्याने आणि लोकप्रतिनिधीची पत्नी म्हणून मी जास्त बारकाईने त्यांच्या जीवन संघर्षाचे निरीक्षण करते आहे. त्या निरीक्षणावर आधारित माझ्या नजरेतून आज शिखरावर पोहोचलेल्यांचा पाया कसा मजबूत असावा लागतो त्याचे शब्द चित्रण आहे. समाजापासून अनभिज्ञ, अनेकदा प्रसिद्धी परान्मुख, तरीही प्रचंड क्षमता आणि बुद्धिमत्ता आणि उज्ज्वल करियर असणाऱ्या ह्या माझ्या सख्या. उद्याच्या इतिहासाला ज्ञात राहाव्यात. कुठेतरी नोंद असावी. त्यांच्या जीवनगाथेमुळे पुढील पिढीला मार्गदर्शन मिळणे मला गरजेचे वाटते. ह्याच उद्देशाने मी लिहिले. अशा या माझ्या सख्या आणि त्यांचे सखे ‘सखी सूत्र’.
-
संगणक युगातील आरोग्य
0आजच्या संगणक-युगातील नव्या पिढीचे काम बरेचसे हे एका जागी बसून करण्याचे असते तसेच या पिढीची जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे यापिढीला अॅसिडिटी, रक्तदाब याबरोबर मानेचे, मनगटाचे, पाठीचे दुखणे अशा आजारांना सामोरे जावे लागते. हे असे का होते हे त्यांना कळत नाही, त्यावर उपाय काय हे ही त्यांना उमगत नाही. अशा तरुणवर्गाला डॉ. जोशी यांचे ‘संगणक युगातील आरोग्य’ हे पुस्तक वाचून अनेक छोट्या-मोठ्या आजारातून मुक्ती मिळू शकते.