
अनादिसिद्धा
0₹320.00निपुण देवालये, लेणी देणाऱ्या अनेक साम्राज्यांच्या इतिहास चाचपडताना दिसत राहतात गाळलेल्या जागा, संस्कृतीतील पुराव्याच्या. त्यांच्या श्वासांची उत्खनन करताना जाणवतात, व्यापून टाकतात – इतिहासात कुठेही इवलालेली अस्तित्व मागे न सोडणाऱ्या शिल्पिनी. आजचे बदामी म्हणजे चालुक्यांचे वातापी अन तिथल्या भव्य लेणी. या लेणी घडवणाऱ्या स्त्री कलाकाराची… ‘शिल्पिनी’ ची काल्पनिक कादंबरी – ‘अनादिसिद्धा’

अनुबंध
0₹250.00दोन वर्षांची असताना वडिलांच्या मूत्यूनंतर एकट्या आईने व्यवस्थित सांभाळ केलेली नोएला आणि तिच्या आईमध्ये अत्यंत घट्ट प्रेमाचा बंध असला तरी आईचा तिच्या इंग्लंडमधील अल्पवैवाहिक आयुष्याबद्दल गुप्तता पाळण्याचा अट्टाहास तिला अनाकलनीय होता. बर्याच वेळा नोएलाला आईचे व्यक्तिमत्त्व गूढ आणि एककल्ली वाटे. त्यातच कर्करोगाची लक्षणे दिसत असताना वैद्यकीय तपासनीस आईने केलेल्या टाळाटाळीमुळे नोएला व्यथित झाली होती. सरतेशेवटी आईला ब्रेस्टकॅन्सर झाल्याचे निदान झाले. भविष्यात आपल्याला ब्रेस्टकॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय शोधताना तिच्यासमोर पर्याय आला तो मॅस्टक्टमीचा म्हणजेच स्तनवपनाचा. आईवरच्या अतुट प्रेमामुळे तिचे मत डावलू न शकणार्या नोएलाने अखेर काय निर्णय घेतला…

अन्न हे पूर्णब्रह्म
0₹290.00विविध भाज्या, फळे, मसाले ज्यांचा ह्या पुस्तकात उल्लेख केला गेला आहे. त्यांचे महत्त्व बच्चा आणि राणी सोबतच छोट्या वाचकांनाही पटेल, आणि ह्या रोजच्या जिन्नसांच्या गमतीजमती बाल वाचकांचा आनंद द्विगुणित करतील.

अपूर्ण आत्मकथा – शेख मुजीबूर रहमान
0₹2,000.00बांगलादेशचा सुवर्ण महोत्सव आणि त्या स्वातंत्र्य लढ्याचे अध्वर्यू शेख मुजीबूर रहमान यांची आत्मकथा.
‘सोनार बांगला’ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचं ! पाकिस्तानच्या तुरुंगात असताना त्यांनी घेतलेल्या आत्मशोधाच्या नोंदीचे हे ग्रंथरूप. संघर्षाचे, कसोटीचे अनेक प्रसंग, दिसलेली – पाहिलेली माणसे, उभारलेले लढे यांचं वर्णन असलेल्या ४ वह्या, काही टिपणं, कात्रणं हे सर्व त्यांच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळालं. त्या सर्वांचे बंगाली भाषेतील संकलन डॉ. फक्रूल आलम यांच्या मदतीने २०१२ साली प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर ते इंग्रजीतही आले. मराठी वाचकांसाठी केलेला त्याचाच हा अनुवाद.
आठवणींचे अमृत
0₹250.00कै. अप्पा साठे (कै. पुरुषोत्तम निळकंठ साठे, वकील, चिपळूण) यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच चतुरस्र होते. सदर लिखाण त्यांनी त्यांच्या शेवटच्या आजारात केले. सदर पुस्तकामध्ये त्यांनी विसाव्या शतकांतील प्रारंभापासूनचा काळ आपणासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

आनंदयात्रा
0₹250.00अमेरिकेची ‘एम्पायर स्टेट’ सामावून घेईल इतक्या उंचीचा कोलंबियन आईसफिल्ड, जगातला सर्वात मोठा अथाबास्का ग्लेशियर, उंचच उंच पर्वतराजी, मोरचुदी पाण्याचे लेक, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी जतन करण्यासाठी नॅशनल पार्क कॅनडियन रॉकीचे नैसर्गिक वैभव अलौकिक आहे. २००० वर्षे आपला देश स्थापण्याची स्वप्ने पाहणारे ज्यू बांधव, त्यांची धडपड, चळवळ आणि परक्या देशात राहून छळ, अवहेलना सहन करूनही आज इतके वर्षे आपला धर्म आणि भाषा जतन करणारे. आपल्या ‘देवाने दिलेल्या जमिनीवर’ देश स्थापून घट्ट पाय रोवून उभे आहेत. १२९ नोबेल पारितोषके ज्यू बांधवांच्या नावावर आहेत. त्यांचा इतिहास, जॉर्डनचा इतिहास वाचून त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. जाज्वल्य देशाभिमान आपण शिकायला हवा.

आनंदयात्री दत्ताजी
0₹200.00श्री. दत्तात्रय गजानन आंबेकर यांचं हे छोटंसं पण अतिशय प्रेरणादायी चरित्र. कोकणात राहून केवळ मॅट्रिक झालेले दत्ताजी मुंबईत आले, प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा डिप्लोमा करून या क्षेत्रात प्रोफेसर म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. अल्पावधीतच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी प्रिंटिंग क्षेत्रात ‘निकेदा आर्ट्स’ हे संस्थांनच निर्माण केलं. आपल्या व्यवसायात त्यांनी आपल्या कुटुंबियांना, नातलगांना सामावून घेतलं. योग्यवेळी व्यवसायातून निवृत्त होत, हाती घेतलेलं समाजसेवेचं व्रत मात्र ते जोपासत आहेत. पत्नी नीताच्या साहचर्यानं आज ७९व्या वर्षी अतिशय समाधानानं, आनंदाची पखरण करीत आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.

आला मनात श्रावण
0₹100.00मन आणि निसर्ग. दोन्हीची रूपं क्षणाक्षणाला बदलणारी. बदलाचे सातत्य तरीही सूत्र सांभाळणारी. यांच्याच सहचर्याने जगणं चालतं. कधी एकमेकांवर परिणाम करीत, कधी एकमेकांना सामावून घेत. मनात साठलेली निसर्गाची रूपं अलवार शब्दांत उलगडतात. भावनांच्या हजार रंगांचे चित्र शब्दांत उमटविण्याचा छंद लागतो. चाकोरीतल्या जीवनाचा वेध घेताना देखील आभाळाची आस लागते, साध्या सरळ मनाचा ठाव शोधणार्या शब्दांना.

उद्गार
0₹300.00या पुस्तकाचे तीन भाग आहेत. ललितलेख, प्रवासवर्णन आणि व्यक्तिगत. पण खरंतर हे सर्वच लेखन ललित आहे; प्रवाही आहे; एकमेकांत मिसळून जाणारं आहे. व्यक्तिचित्र रेखाटताना मेधा किरीट सहजपणे कवितेच्या सुरात लिहितात. किंवा प्रवासवर्णनात सहज व्यक्तिगत आठवण गुंफली जाते.

उद्देश-शहरी दारिद्रय निवारणाचा
0₹100.00झोपडपट्टीतील सामाजिक कार्याची सांगड अभ्यासकाच्या भूमिकेतून तपासण्याचा. त्यावर विचार करण्याचा. तोडगा निघतो का ते पाहण्याचा. सोपे नव्हते ते. झोपडपट्टी नावालाच किती विरोध होता, पण डॉ. रमेश साने सर यांच्या प्रोत्साहनामुळे, मुंबई विश्वविद्यालयात वेगळा विभाग उघडण्यापर्यंत झेप घेता आली. या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला, त्याची प्रचिती आली.

उद्धव ठाकरे : द टायगर
0₹200.00‘उद्धव ठाकरे : द टायगर ‘ या पुस्तकात श्री. उद्धवजी ठाकरे यांची एक वेगळी प्रतिमा आपल्यासमोर मांडली आहे. एक कुशल राजकारणी, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ह्या भूमिकेतून जाताना त्यांनी आपल्या आपल्या फोटोग्राफीचा छंद कसा जोपासला, त्यातूनही त्यांनी केलेली समाजसेवा आणि त्यांची वन्यप्राण्यांविषयी आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी या पुस्तकातून मांडण्याच्या प्रयत्न आहे. फोटोग्राफीसाठी लागणारा संयम, अचूक टायमिंग, एकाग्रता ह्या कला.

औषधी विश्वकोश
0₹800.00आपल्या रोजच्या वापरातील आणि आजूबाजूस आढळणार्या अनेक औषधींचा ‘औषधी विश्वकोश’ या पुस्तकात खूप विस्तृत अभ्यास केला आहे. या पुस्तकात मांडलेली ही संकल्पना मुळातच नावीन्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ, सर्व परिचित सोन्याचा विचार केला तर असे आढळते की, मध्यकालीन युरोपमध्ये सोन्याचा वर्ख दिलेल्या गोळ्या व सोन्याचे पाणी चढविलेली औषधीही सोन्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे संसर्गजन्य आजारांत वापरली जायची. नैसर्गिक गोष्टींची शास्त्रीय माहिती जाणून घेणार्या वाचकांसाठी आणि प्रत्येक वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासाठी संग्राह्य विश्वकोश.












