-
कर्मयोद्धा
0Mr. Ram Naik, a veteran Indian politician, authored a book titled ‘Charaiveti Charaiveti’ in the year 2016. The book revolves around Mr. Ram Naik’s life experiences. This book is an attempt to document his journey since he was diagnosed with cancer about 21 years ago. It is a compilation of columns based on his anecdotal experiences, which were previously published in a Marathi daily newspaper named ‘Sakal’. The book was translated in multiple languages across India and gathered tremendous praise throughout the country. Multiple politicians and eminent personalities including our honourable prime minister praised the book and spoke about the book at various events & gatherings. This book ‘Karmayoddha’ is a beautiful compilation of the various speeches that these personalities have given about the book over the years with pictures of those events where the book was unveiled and spoken about.
-
कल्लोळतीर्थ
0“वाहत्या काळानेही बांधून टाकता येत नाहीत, अशी कलाकृती आकाराला येते, तेव्हा त्यामागे अभ्यास असतो; तंत्र असतं; एक ठोस शास्त्र असतं. पण त्याही पलीकडे काहीतरी भक्कम कारण असतं. त्या कारणाशी पोहोचता यायला हवं.” “हे अव्याहत चक्र आहे. नवीन उगवतच राहतं प्रत्येक काळात.” “हे गरजेचं नाहीच की निर्माणाच्या काळात त्याचा उद्देश कळेल किंवा पोहचेल सर्वांपर्यंत, जन्म ते अर्थ यामध्ये कदाचित हजारो वर्षांचं अंतर असेल. या हजारो वर्षांनी एखाद्या अवलियाची वाटच पाहिलेली असते रे, जो जगाला सांगणार असतो, निर्माणामागचा उद्देश !”
-
काय खाऊ किती खाऊ
0कुठल्याही आजारासाठी उपचारासोबत योग्य तो आहार घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या त्यांच्या पुस्तकात पचनसंस्थेचे आजार, हृदयविकार व मधुमेह, कावीळ, अतिसर, अतिआम्लता, जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, गाऊट, मूतखडे हायपोथायरॉयइडीझम, गरोदरपणातील व स्तनपानाच्या वेळेस योग्य असा आहार, विविध वयोगटातील व्यक्तींसाठी आहार, परीक्षार्थी मुलांसाठीचा आहार व बाजारात मिळणारी प्रथिनांची उत्पादने अशा इतर अनेक आहाराशी निगडित विषयावर विस्तृत माहिती आहे.
-
कुछ कहना है
0एक मोटर गॅरेजमें काम करते करते और फ्रिटाईम में फिल्मोमें काम की तलाश में स्ट्रगल करनेवाले टॅक्सी चलानेवाले ड्रायव्हर की कहानी.
-
कॅलिफोर्निया ते कैलाश
0आपल्या भारतीय संस्कृतीत एक सर्वसाधारण समज असा आहे की, सामान्य माणसांच्या ‘भोग’ आणि ‘चैन’ यांचा आदर्श (Role Model) म्हणजे ‘अमेरिका!’ दुसर्या बाजूला आपल्या व्यावहारिक, प्रापंचिक जगण्यातील पुण्यकर्माचे ‘फलित’ म्हणजे; कैलाश-मानसरोवर यात्रा! परदेशवारीत अनुभवलेली पाश्चात्त्यांची सभ्यता, शिस्त, भौतिक आनंद घेण्याची वृत्ती तर कैलाश- मानसरोवर यात्रेत अनुभवलेली ‘यात्रेकरूंची’ भक्ती व त्याच्याबरोबर आत्मक्लेश करून घेण्याची सहनशक्ती.
-
चरैवेति ! चरैवेति !!
0चाकोरीबद्ध जीवनाला अनपेक्षित कलाटणी देत ऐन पस्तिशीत संघटनेचे काम करण्यासाठी नोकरीवर पाणी सोडून अवाढव्य मुंबईचे नेतृत्व करून सलग आठ निवडणुका जिंकण्याचा विक्रम करणारे, कर्करोगावर मात करून बोनस आयुष्य जगताना केंद्रीय मंत्री बनून देशभर आपल्या कामाची छाप पाडणारे, स्वतःहून निवडणूक सन्यास घेतल्यानंतर वयाच्या ८१ व्या वर्षी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे – उत्तर प्रदेशचे – राज्यपाल म्हणून आजही दिवसाचे १२-१२ तास काम करणारे राम नाईक म्हणजे आश्चर्यच !
सलग वर्षभर दैनिक सकाळ मधील सदरातून आपल्या जीवनातल्या आठवणी त्यांनी उलगडल्या. त्याच लेखांचे हे संकलन.
-
जंक्शन
0मोटरमन म्हणून असलेले त्यांचे अनुभव अक्षरश: चित्तथरारक आहेत. मग गाडी खाली येऊन आत्महत्या करणार्यां संबंधातील अनुभव असोत वा चळवळ करणारे आंदोलक गाड्या पेटवून द्यायला येतात त्यावेळचे वातावरण असो. रेल्वे ड्रायव्हर्सना दररोज अग्निपरीक्षेतून जावे लागते.
श्री. विनायक रत्नपारखी यांच्या अनुभवांचा अनुभव देणारे हे ‘जंक्शन’ तुम्हांलाही एका निराळ्या ट्रॅकवर घेऊन जाईल.
-
जगा वेगळी माणसं, जगावेगळ्या गोष्टी
0जगावेगळी माणसं, जगावेगळ्या गोष्टी म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाच्या अथांग सागरातून मंथन करून मिळालेले अमूल्य मोती, हिरे, माणकं! स्वत:च्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजासाठी तसेच जगाच्या कल्याणासाठी झटणार्या या व्यक्ती म्हणजे खरे आदर्श आहेत.
-
जाणीव
0वैचारिक लेखातून साधारणतः सत्य सांगण्याच्या प्रयत्न होतो. पण, भावसत्य सांगायला ललितलेखन व्हावे लागते. हे ‘जाणीव’ या ललितबंधसंग्रहातून लेखिकेची सामाजिक परिवर्तनाची आस्था, सहज तरी प्रकर्षाने जाणवतेच; पण, वैचारिक परिवर्तनाचीही आस त्यांना आहे हि थक्क करणाऱ्या वास्तवाची ‘जाणीव’ लडिवाळपणे होत राहते.
-
जॉन मार्शल – एक असामान्य पुरातत्वज्ञ
0जॉन मार्शल ह्याने भारतातील पुरातन वस्तू आणि वास्तू ह्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला आणि त्यांच्याबद्दल संशोधन केले. त्यांची दुरुस्ती, जीर्णोद्धार, देखभाल व जतन करण्यासाठी त्याने शास्त्रोक्त पद्धतीचा महत्त्वपूर्ण पाया घातला. आपण केलेल्या उत्खनन आणि शोधाच्या आधारावर त्याने सिद्ध केले की भारताचा ज्ञात इतिहास ख्रिस्तपूर्व किमान ३००० वर्षांइतका पुरातन आहे. त्याने उत्खननासाठी निवडलेल्या प्रत्येक ठिकाणी, भारताच्या पुरातनतेचे पुरावे प्रचंड प्रमाणावर सापडले. त्यामुळे भारताचा इतिहास उलगडणे शक्य झाले.
-
झेप घेतली आकाशी
0एका सर्वसाधारण विद्यार्थ्याने स्पर्धेच्या झगमगाटात संघर्ष करत डॉक्टर बनण्याचे स्वतःचे स्वप्न व घरच्यांच्या अपेक्षा ह्या सर्व गोष्टींची सांगड घालत यश कसे संपादन केले याबद्दल उलगडा करणारे हे पुस्तक. तसेच डॉक्टर व इंजिनीयर होऊ इच्छिणार्यांसाठी, विविध परीक्षांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती व ज्या परीक्षांत ज्यांनी उत्तुंग यश मिळविले आहे. अशा गुणवंतांची मनोगते देखील दिली आहेत.
-
ताई – पद्मभूषण सुमित्राताई महाजन
0भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसदीय कामकाज, लोकसभेच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या नेत्या पुढील बिकट आव्हाने आणि अधिकारांची अफाट व्याप्ती या सर्वांना न्याय देणाऱ्या एका पंचवार्षिक व्रतस्थ कर्तृत्वाची प्रेरक यशोगाथा ग्रंथ रूपात… पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या लोकसभा अध्यक्ष पदावरील शिखरस्थ कारकिर्दीचा मेधा किरीट यांच्या लेखणीतून सादर केलेला बहुपदरी आलेख…