कुठल्याही आजारासाठी उपचारासोबत योग्य तो आहार घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या त्यांच्या पुस्तकात पचनसंस्थेचे आजार, हृदयविकार व मधुमेह, कावीळ, अतिसर, अतिआम्लता, जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, गाऊट, मूतखडे हायपोथायरॉयइडीझम, गरोदरपणातील व स्तनपानाच्या वेळेस योग्य असा आहार, विविध वयोगटातील व्यक्तींसाठी आहार, परीक्षार्थी मुलांसाठीचा आहार व बाजारात मिळणारी प्रथिनांची उत्पादने अशा इतर अनेक आहाराशी निगडित विषयावर विस्तृत माहिती आहे.