• Apoorn Atmakatha - Shaikh Mujibur Rahman

    अपूर्ण आत्मकथा – शेख मुजीबूर रहमान

    0

    बांगलादेशचा सुवर्ण महोत्सव आणि त्या स्वातंत्र्य लढ्याचे अध्वर्यू शेख मुजीबूर रहमान यांची आत्मकथा.
    ‘सोनार बांगला’ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचं ! पाकिस्तानच्या तुरुंगात असताना त्यांनी घेतलेल्या आत्मशोधाच्या नोंदीचे हे ग्रंथरूप. संघर्षाचे, कसोटीचे अनेक प्रसंग, दिसलेली – पाहिलेली माणसे, उभारलेले लढे यांचं वर्णन असलेल्या ४ वह्या, काही टिपणं, कात्रणं हे सर्व त्यांच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळालं. त्या सर्वांचे बंगाली भाषेतील संकलन डॉ. फक्रूल आलम यांच्या मदतीने २०१२ साली प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर ते इंग्रजीतही आले. मराठी वाचकांसाठी केलेला त्याचाच हा अनुवाद.

    2,000.00
    Add to cart
  • ताई - पदमभूषण सुमित्राताई महाजन लेखक - मेधा किरीट

    ताई – पद्मभूषण सुमित्राताई महाजन

    0

    भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसदीय कामकाज, लोकसभेच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या नेत्या पुढील बिकट आव्हाने आणि अधिकारांची अफाट व्याप्ती या सर्वांना न्याय देणाऱ्या एका पंचवार्षिक व्रतस्थ कर्तृत्वाची प्रेरक यशोगाथा ग्रंथ रूपात… पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या लोकसभा अध्यक्ष पदावरील शिखरस्थ कारकिर्दीचा मेधा किरीट यांच्या लेखणीतून सादर केलेला बहुपदरी आलेख…

    350.00
    Add to cart
  • दुस्तर अफगाणिस्तान लेखिका : मनीषा टिकेकर

    दुस्तर अफगाणिस्तान

    0

    ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स म्हणजेच साम्राज्यांची दफनभूमी म्हणून ख्यात असलेल्या अफगाणिस्तानचा प्रदीर्घ इतिहास मोठा उलथापालथीचा आणि जटिल आहे. अफगाणिस्तानचं गेल्या शतकभराचं राजकारण प्रक्षुब्ध आणि रक्तरंजित राहिलं आहे. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालखंडातल्या अफगाणिस्तानातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून प्रस्तुतच पुस्तक दुस्तर अफगाणिस्तान म्हणजे गेल्या शंभर- सव्वाशे वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून – घटना आणि संकल्पना या दोहोंतून घेतलेला वेध आहे.

    360.00
    Add to cart
  • नरेंद्र मोदी - जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा सर्जक

    नरेंद्र मोदी – जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा सर्जक

    0

    देशाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या कालबाह्य आणि अकार्यक्षम व्यवस्थांचा डोंगर हटवून नरेंद्र मोदी यांनी राजकीय – औद्योगिक – आर्थिक – सामाजिक वर्तमानाला नवा वेगवान चेहरा दिला; हे त्यांनी कसे सध्या केले ? मोदींच्या नेतृत्वशैलीची वैशिष्ट्ये, गुणविशेष, त्यांनी अंगिकारलेली मूल्ये आणि प्रशासनाच्या रुक्ष व्यवस्थेला त्यांनी दिलेली मानवी भावभावनांची, करुणेची किनार या सगळ्या गोष्टींची काही व्याख्या करता येईल का ? कशी ? – हे पुस्तक म्हणजे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत केलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रवास आहे.

    650.00
    Add to cart
  • महासत्तांतर

    महासत्तांतर

    0

    महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर कल्पनातीत फासे टाकले गेले. त्यातून एक अपूर्व महासत्तांतर घडलं. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मोदी – शाह या भाजप नेत्यांच्या आशीर्वादानं त्याच खुर्चीवर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे विराजमान झाले. हा उठाव फसला असता तर ही धुमश्चक्री संपल्यावर इतरांच्या हितासाठी स्वतःला संपवण्याचा एकमेव पर्याय एकनाथ शिंदेंकडे होता. पडद्यामागच्या या आणि अश्या असंख्य अज्ञात नोंदींची ही अस्सल बखर.

    महासत्तांतराच्या थेट परिघावर उभं राहून आतल्या-बाहेरच्या घडामोडी पाहणाऱ्या एका सजग आणि चतुर पत्रकारानं दाखवलेली मती गुंग करून टाकणारी सत्तानाट्याची अंतस्थ संहिता.

    वास्तव आणि एखाद्या वेब मालिकेसारखी थरारक…

    250.00
    Add to cart
  • माझी राजकीय मुशाफिरी - लेखक : श्री. अरुण साठे

    माझी राजकीय मुशाफिरी

    0

    श्री. अरुण साठे यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एल. एल. बी. पदवी मिळवली. ते मुंबई उच्च न्यायालयाचे नियुक्त वरिष्ठ वकील आहेत, आणि विविध सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय आहेत. लेखकाने पन्नास वर्षांच्या कालावधीत लढवलेले लढे, केलेले सामाजिक कार्य आणि त्या सर्वांविषयीची त्यांची मते, दृष्टिकोन या पुस्तकात व्यक्त झाला आहे. हे त्यांचे आत्मचरित्र नाही तर राजकारणासह अनेक राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचा घेतलेला हा आढावा आहे. लेखकाचे अनुभव, त्यांचे विचार आणि विविध राजकीय नेत्यांविषयीचे अनेक प्रसंग वाचकांना आवडतील आणि तरुण वाचकांना विचारप्रवृत्त करतील असे आहेत.

    350.00
    Add to cart
  • सेतुबंध लेखक : नरेंद्र मोदी - राजाभाऊ नेने

    सेतुबंध

    0

    हा वकीलसाहेबांचा चरित्र ग्रंथ नाही, किंवा गौरवगाथाही नाही… हे आहे तपस्या व पुरुषार्थाचे एक प्रदीर्घ शब्दांकन !!!
    गुजरातमध्ये संघकार्य आणि संघपरिवारामध्ये वकीलसाहेबांचे एक अनोखे स्थान… गुजरातच्या जनजीवनात त्यांचे अनोखे योगदान… शब्दांच्या माध्यमातून सर्वकाही यथार्थ उभे करणे शक्य नाही. तरीसुद्धा वकीलसाहेबांच्या प्रती अंतःकरणाचा उत्कट-भाव हे सर्व शब्दरूपी व्यक्त करण्याची प्रेरणा आहे त्यासाठी हा ‘सेतुबंध’

    900.00
    Add to cart