श्री. दत्तात्रय गजानन आंबेकर यांचं हे छोटंसं पण अतिशय प्रेरणादायी चरित्र. कोकणात राहून केवळ मॅट्रिक झालेले दत्ताजी मुंबईत आले, प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा डिप्लोमा करून या क्षेत्रात प्रोफेसर म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. अल्पावधीतच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी प्रिंटिंग क्षेत्रात ‘निकेदा आर्ट्स’ हे संस्थांनच निर्माण केलं. आपल्या व्यवसायात त्यांनी आपल्या कुटुंबियांना, नातलगांना सामावून घेतलं. योग्यवेळी व्यवसायातून निवृत्त होत, हाती घेतलेलं समाजसेवेचं व्रत मात्र ते जोपासत आहेत. पत्नी नीताच्या साहचर्यानं आज ७९व्या वर्षी अतिशय समाधानानं, आनंदाची पखरण करीत आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.