देशाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या कालबाह्य आणि अकार्यक्षम व्यवस्थांचा डोंगर हटवून नरेंद्र मोदी यांनी राजकीय – औद्योगिक – आर्थिक – सामाजिक वर्तमानाला नवा वेगवान चेहरा दिला; हे त्यांनी कसे सध्या केले ? मोदींच्या नेतृत्वशैलीची वैशिष्ट्ये, गुणविशेष, त्यांनी अंगिकारलेली मूल्ये आणि प्रशासनाच्या रुक्ष व्यवस्थेला त्यांनी दिलेली मानवी भावभावनांची, करुणेची किनार या सगळ्या गोष्टींची काही व्याख्या करता येईल का ? कशी ? – हे पुस्तक म्हणजे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत केलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रवास आहे.