खरं तर या स्मरण रंजनाला मी लेख, पुस्तिका वगैरे म्हणणार नाही. मला वाटतं श्री. विजय केळकर यांनी रंगवलेला हा मनातल्या भावनांचा एक गप्पांचा कट्टाच आहे. गप्पा थोड्याच पूर्वनियोजित असतात? त्या स्वैरच असतात आणि सहजही असतात, म्हणून आपण वाचक (किंवा श्रोते म्हणा) केळकरांच्या गप्पांमध्ये अडकून पडतो आणि आपल्या समोर त्यांच्याबरोबरच ‘सवाई’च्या ह्या असंख्य आठवणी उलगडत जातात.