अमेरिकेची ‘एम्पायर स्टेट’ सामावून घेईल इतक्या उंचीचा कोलंबियन आईसफिल्ड, जगातला सर्वात मोठा अथाबास्का ग्लेशियर, उंचच उंच पर्वतराजी, मोरचुदी पाण्याचे लेक, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी जतन करण्यासाठी नॅशनल पार्क कॅनडियन रॉकीचे नैसर्गिक वैभव अलौकिक आहे. २००० वर्षे आपला देश स्थापण्याची स्वप्ने पाहणारे ज्यू बांधव, त्यांची धडपड, चळवळ आणि परक्या देशात राहून छळ, अवहेलना सहन करूनही आज इतके वर्षे आपला धर्म आणि भाषा जतन करणारे. आपल्या ‘देवाने दिलेल्या जमिनीवर’ देश स्थापून घट्ट पाय रोवून उभे आहेत. १२९ नोबेल पारितोषके ज्यू बांधवांच्या नावावर आहेत. त्यांचा इतिहास, जॉर्डनचा इतिहास वाचून त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. जाज्वल्य देशाभिमान आपण शिकायला हवा.