-
अन्न हे पूर्णब्रह्म
0विविध भाज्या, फळे, मसाले ज्यांचा ह्या पुस्तकात उल्लेख केला गेला आहे. त्यांचे महत्त्व बच्चा आणि राणी सोबतच छोट्या वाचकांनाही पटेल, आणि ह्या रोजच्या जिन्नसांच्या गमतीजमती बाल वाचकांचा आनंद द्विगुणित करतील.
-
औषधी विश्वकोश
0आपल्या रोजच्या वापरातील आणि आजूबाजूस आढळणार्या अनेक औषधींचा ‘औषधी विश्वकोश’ या पुस्तकात खूप विस्तृत अभ्यास केला आहे. या पुस्तकात मांडलेली ही संकल्पना मुळातच नावीन्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ, सर्व परिचित सोन्याचा विचार केला तर असे आढळते की, मध्यकालीन युरोपमध्ये सोन्याचा वर्ख दिलेल्या गोळ्या व सोन्याचे पाणी चढविलेली औषधीही सोन्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे संसर्गजन्य आजारांत वापरली जायची. नैसर्गिक गोष्टींची शास्त्रीय माहिती जाणून घेणार्या वाचकांसाठी आणि प्रत्येक वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासाठी संग्राह्य विश्वकोश.
-
काय खाऊ किती खाऊ
0कुठल्याही आजारासाठी उपचारासोबत योग्य तो आहार घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या त्यांच्या पुस्तकात पचनसंस्थेचे आजार, हृदयविकार व मधुमेह, कावीळ, अतिसर, अतिआम्लता, जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, गाऊट, मूतखडे हायपोथायरॉयइडीझम, गरोदरपणातील व स्तनपानाच्या वेळेस योग्य असा आहार, विविध वयोगटातील व्यक्तींसाठी आहार, परीक्षार्थी मुलांसाठीचा आहार व बाजारात मिळणारी प्रथिनांची उत्पादने अशा इतर अनेक आहाराशी निगडित विषयावर विस्तृत माहिती आहे.
-
जगा वेगळी माणसं, जगावेगळ्या गोष्टी
0जगावेगळी माणसं, जगावेगळ्या गोष्टी म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाच्या अथांग सागरातून मंथन करून मिळालेले अमूल्य मोती, हिरे, माणकं! स्वत:च्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजासाठी तसेच जगाच्या कल्याणासाठी झटणार्या या व्यक्ती म्हणजे खरे आदर्श आहेत.
-
मळभ कोरोनाचे
0‘मळभ कोरोनाचे’ हे पुस्तक अनुभवावर आधारलेले आहे. मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, सिंधुदुर्ग (देवगड) या भागात काम करता आले. त्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे. त्याचबरोबर गाठीशी असलेला अनुभव, इंटरनेट माध्यम, वर्तमानपत्रे (देशी / विदेशी) अहवाल याचा अभ्यास करून आपल्यासमोर ‘मळभ कोरोनाचे’ पुस्तक आणले आहे, प्रत्यक्ष माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी.
-
माझा मृत्युंजय
0मूत्रपिंडासारख्या दुर्धर आजाराशी प्रामाणिकपणे एक शूर लढवय्या वीराप्रमाणे लढून त्यावर मृत्युंजय मिळवून एक प्रदीर्घ जीवन जगणार्या माणसाची कथा.
-
वाढत्या वयात चिरतरुण राहण्याची कला
0डॉ. पी. एस. रामाणींची जॉगिंग, गिर्यारोहणाची आवड आजही कमी झालेली नाही. त्यांना लेखन करायला खूप आवडते आणि हे त्यांचे प्रकाशित झालेले ७९ वे पुस्तक आहे. त्यांना संगीताची आवड आहे आणि लहानपणी संगीताच्या संदर्भात त्यांना जे करता आले नाही ते आता करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याआधीच ते तबलावादनाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाले असून तिसऱ्या परीक्षेची तयारी करत आहेत. इतकेच नाही तर सामाजिक कार्यातीलदेखील त्यांची आवड कमी झालेली नाही. ‘शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी माणसाने सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि औदार्याने जगले पाहिजे’ असे त्यांचे मत आहे.
-
वास्तव कुपोषणाचे
0हे पुस्तक लिहिण्याचा विचार मनात का आला?
मेळघाट, पालघर, ठाणे ग्रामीण, पेठ, सुरगणा, अकलकुवा, धडगाव या भागातील आदिवासी जनतेच्या जीवनाचे ‘वास्तव’ समोर आणण्यासाठी मान. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मा. उद्धवसाहेब यांनी या भागात काम करण्यासाठी प्रेरणा दिली म्हणूनच हे सर्व मांडू शकलो. मृत्यू अटळ आहे. शासकीय योजनाही आहेत; पण मृत्यू रोखण्यासाठी कुठे कमी पडतात ते वास्तव मांडण्यासाठी हे लेखन!
-
संगणक युगातील आरोग्य
0आजच्या संगणक-युगातील नव्या पिढीचे काम बरेचसे हे एका जागी बसून करण्याचे असते तसेच या पिढीची जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे यापिढीला अॅसिडिटी, रक्तदाब याबरोबर मानेचे, मनगटाचे, पाठीचे दुखणे अशा आजारांना सामोरे जावे लागते. हे असे का होते हे त्यांना कळत नाही, त्यावर उपाय काय हे ही त्यांना उमगत नाही. अशा तरुणवर्गाला डॉ. जोशी यांचे ‘संगणक युगातील आरोग्य’ हे पुस्तक वाचून अनेक छोट्या-मोठ्या आजारातून मुक्ती मिळू शकते.