-
-29%
अतुलनीय
0नॅसकॉमचे संस्थापक सदस्य श्री. हरीश मेहता लिखित… ‘अतुलनीय’
‘भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड पाठबळ माहिती (IT) उद्योगाने दिले आहे’. असे ठामपणे प्रतिपादन करताना या पुस्तकामध्ये हरीश मेहता यांनी त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाचा उदय यांची गुंफण अत्यंत कुशलतेने केली आहे. नॅसकॉमच्या इतिहासाचा आणि हरीश मेहतांच्या आयुष्याच्या प्रवासाचा अमूल्य दस्तऐवज आपल्यापुढे ठेवला आहे. १९८८ मध्ये स्थापन झालेल्या नॅसकॉमने भारतीय तांत्रज्ञानिक उद्योग वृद्धिंगत व्हावा यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाला हातभार लावून भारताचे जागतिक स्पर्धेतील स्थान मजबूत केले. नॅसकॉमची निर्मिती आणि उभारणीमध्ये हरीश मेहता यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अत्यंत खंबीरपणे नॅसकॉमचे नेतृत्व केले आणि तांत्रज्ञानिक दिग्गजांना समान उद्दिष्टांवर काम करण्यासाठी एकत्र आणले. ओघवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय, पथदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
-
अपूर्ण आत्मकथा – शेख मुजीबूर रहमान
0बांगलादेशचा सुवर्ण महोत्सव आणि त्या स्वातंत्र्य लढ्याचे अध्वर्यू शेख मुजीबूर रहमान यांची आत्मकथा.
‘सोनार बांगला’ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचं ! पाकिस्तानच्या तुरुंगात असताना त्यांनी घेतलेल्या आत्मशोधाच्या नोंदीचे हे ग्रंथरूप. संघर्षाचे, कसोटीचे अनेक प्रसंग, दिसलेली – पाहिलेली माणसे, उभारलेले लढे यांचं वर्णन असलेल्या ४ वह्या, काही टिपणं, कात्रणं हे सर्व त्यांच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळालं. त्या सर्वांचे बंगाली भाषेतील संकलन डॉ. फक्रूल आलम यांच्या मदतीने २०१२ साली प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर ते इंग्रजीतही आले. मराठी वाचकांसाठी केलेला त्याचाच हा अनुवाद. -
आठवणींचे अमृत
0कै. अप्पा साठे (कै. पुरुषोत्तम निळकंठ साठे, वकील, चिपळूण) यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच चतुरस्र होते. सदर लिखाण त्यांनी त्यांच्या शेवटच्या आजारात केले. सदर पुस्तकामध्ये त्यांनी विसाव्या शतकांतील प्रारंभापासूनचा काळ आपणासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
-
आनंदयात्री दत्ताजी
0श्री. दत्तात्रय गजानन आंबेकर यांचं हे छोटंसं पण अतिशय प्रेरणादायी चरित्र. कोकणात राहून केवळ मॅट्रिक झालेले दत्ताजी मुंबईत आले, प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा डिप्लोमा करून या क्षेत्रात प्रोफेसर म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. अल्पावधीतच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी प्रिंटिंग क्षेत्रात ‘निकेदा आर्ट्स’ हे संस्थांनच निर्माण केलं. आपल्या व्यवसायात त्यांनी आपल्या कुटुंबियांना, नातलगांना सामावून घेतलं. योग्यवेळी व्यवसायातून निवृत्त होत, हाती घेतलेलं समाजसेवेचं व्रत मात्र ते जोपासत आहेत. पत्नी नीताच्या साहचर्यानं आज ७९व्या वर्षी अतिशय समाधानानं, आनंदाची पखरण करीत आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.
-
उद्गार
0या पुस्तकाचे तीन भाग आहेत. ललितलेख, प्रवासवर्णन आणि व्यक्तिगत. पण खरंतर हे सर्वच लेखन ललित आहे; प्रवाही आहे; एकमेकांत मिसळून जाणारं आहे. व्यक्तिचित्र रेखाटताना मेधा किरीट सहजपणे कवितेच्या सुरात लिहितात. किंवा प्रवासवर्णनात सहज व्यक्तिगत आठवण गुंफली जाते.
-
चरैवेति ! चरैवेति !!
0चाकोरीबद्ध जीवनाला अनपेक्षित कलाटणी देत ऐन पस्तिशीत संघटनेचे काम करण्यासाठी नोकरीवर पाणी सोडून अवाढव्य मुंबईचे नेतृत्व करून सलग आठ निवडणुका जिंकण्याचा विक्रम करणारे, कर्करोगावर मात करून बोनस आयुष्य जगताना केंद्रीय मंत्री बनून देशभर आपल्या कामाची छाप पाडणारे, स्वतःहून निवडणूक सन्यास घेतल्यानंतर वयाच्या ८१ व्या वर्षी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे – उत्तर प्रदेशचे – राज्यपाल म्हणून आजही दिवसाचे १२-१२ तास काम करणारे राम नाईक म्हणजे आश्चर्यच !
सलग वर्षभर दैनिक सकाळ मधील सदरातून आपल्या जीवनातल्या आठवणी त्यांनी उलगडल्या. त्याच लेखांचे हे संकलन.
-
सावित्रीच्या लेकी
0स्त्रीने ठरवलं तर ती कोणत्याही विषयाचा अभ्यास करून त्यात पारंगत होऊन स्वतःची जागा निर्माण करू शकते. अशाच काही होतकरू आणि आपापल्या विषयात पारंगत असणाऱ्या स्त्रिया ज्यांनी यशाची शिखरे पार केली आहेत यांची माहिती असणारे हे पुस्तक. ज्यात डॉ. विजया वाड यांच्यासोबत १७ लेखकांनी यात आपले योगदान दिले आहे.
-
सेतुबंध
0हा वकीलसाहेबांचा चरित्र ग्रंथ नाही, किंवा गौरवगाथाही नाही… हे आहे तपस्या व पुरुषार्थाचे एक प्रदीर्घ शब्दांकन !!!
गुजरातमध्ये संघकार्य आणि संघपरिवारामध्ये वकीलसाहेबांचे एक अनोखे स्थान… गुजरातच्या जनजीवनात त्यांचे अनोखे योगदान… शब्दांच्या माध्यमातून सर्वकाही यथार्थ उभे करणे शक्य नाही. तरीसुद्धा वकीलसाहेबांच्या प्रती अंतःकरणाचा उत्कट-भाव हे सर्व शब्दरूपी व्यक्त करण्याची प्रेरणा आहे त्यासाठी हा ‘सेतुबंध’