शिवछत्रपतींच्या दुर्गांचे परिपूर्ण दृष्य, त्यांची भव्यता, वैभव, भक्कम संरक्षण क्षमता, इतिहास, स्थापत्यकला, बांधणीची विविधता अशा विषयांचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला उपयुक्त ग्रंथ. स्वराज्यातील दुर्गांबरोबर इतर राजवटीतील दुर्गांच्या स्थापत्याचे अस्सल साधनांच्या आधारे डॉ. केदार फाळके यांनी केलेले सखोल संशोधन. स्वराज्याच्या दोन राजधान्यांचा आणि राजधानीच्या स्थलांतराचा घेतलेला आढावा. दुर्गांच्या संवर्धनाकरिता उपयुक्त उदाहरणे म्हणून जागतिक वारसास्थळांची केलेली चर्चा.