इतके वर्षं एक कार्यकर्ती या नात्याने आणि लोकप्रतिनिधीची पत्नी म्हणून मी जास्त बारकाईने त्यांच्या जीवन संघर्षाचे निरीक्षण करते आहे. त्या निरीक्षणावर आधारित माझ्या नजरेतून आज शिखरावर पोहोचलेल्यांचा पाया कसा मजबूत असावा लागतो त्याचे शब्द चित्रण आहे. समाजापासून अनभिज्ञ, अनेकदा प्रसिद्धी परान्मुख, तरीही प्रचंड क्षमता आणि बुद्धिमत्ता आणि उज्ज्वल करियर असणाऱ्या ह्या माझ्या सख्या. उद्याच्या इतिहासाला ज्ञात राहाव्यात. कुठेतरी नोंद असावी. त्यांच्या जीवनगाथेमुळे पुढील पिढीला मार्गदर्शन मिळणे मला गरजेचे वाटते. ह्याच उद्देशाने मी लिहिले. अशा या माझ्या सख्या आणि त्यांचे सखे ‘सखी सूत्र’.