-
अनादिसिद्धा
0निपुण देवालये, लेणी देणाऱ्या अनेक साम्राज्यांच्या इतिहास चाचपडताना दिसत राहतात गाळलेल्या जागा, संस्कृतीतील पुराव्याच्या. त्यांच्या श्वासांची उत्खनन करताना जाणवतात, व्यापून टाकतात – इतिहासात कुठेही इवलालेली अस्तित्व मागे न सोडणाऱ्या शिल्पिनी. आजचे बदामी म्हणजे चालुक्यांचे वातापी अन तिथल्या भव्य लेणी. या लेणी घडवणाऱ्या स्त्री कलाकाराची… ‘शिल्पिनी’ ची काल्पनिक कादंबरी – ‘अनादिसिद्धा’
-
अनुबंध
0दोन वर्षांची असताना वडिलांच्या मूत्यूनंतर एकट्या आईने व्यवस्थित सांभाळ केलेली नोएला आणि तिच्या आईमध्ये अत्यंत घट्ट प्रेमाचा बंध असला तरी आईचा तिच्या इंग्लंडमधील अल्पवैवाहिक आयुष्याबद्दल गुप्तता पाळण्याचा अट्टाहास तिला अनाकलनीय होता. बर्याच वेळा नोएलाला आईचे व्यक्तिमत्त्व गूढ आणि एककल्ली वाटे. त्यातच कर्करोगाची लक्षणे दिसत असताना वैद्यकीय तपासनीस आईने केलेल्या टाळाटाळीमुळे नोएला व्यथित झाली होती. सरतेशेवटी आईला ब्रेस्टकॅन्सर झाल्याचे निदान झाले. भविष्यात आपल्याला ब्रेस्टकॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय शोधताना तिच्यासमोर पर्याय आला तो मॅस्टक्टमीचा म्हणजेच स्तनवपनाचा. आईवरच्या अतुट प्रेमामुळे तिचे मत डावलू न शकणार्या नोएलाने अखेर काय निर्णय घेतला…
-
जाणीव
0वैचारिक लेखातून साधारणतः सत्य सांगण्याच्या प्रयत्न होतो. पण, भावसत्य सांगायला ललितलेखन व्हावे लागते. हे ‘जाणीव’ या ललितबंधसंग्रहातून लेखिकेची सामाजिक परिवर्तनाची आस्था, सहज तरी प्रकर्षाने जाणवतेच; पण, वैचारिक परिवर्तनाचीही आस त्यांना आहे हि थक्क करणाऱ्या वास्तवाची ‘जाणीव’ लडिवाळपणे होत राहते.
-
तुझ्याशीच बोलतेय मी
0३०-३५ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि शांभवी यांचे पती श्री. जयराम हर्डीकर यांचे अपघाती निधन झाले. प्रेमाचा डाव नुकताच कुठे रंगायला लागला होता. दोन गोजिरवाण्या मुलींनी जयराम आणि शांभवी यांचे कुटुंब साकारले होते. एकसंध असे हे कुटुंब एका क्षणात विसकटून गेले. शांभवीला खरेच वाटेना की, आपला निरोप घेऊन गेलेले जयराम आता परत कधीच परतणार नाहीत. पण म्हणतात ना, ‘बाईचे पहिले प्रेम कधीच संपत नाही.’ शांभवी सगळे सोपस्कार पूर्ण करीत, आपली कर्तव्ये पाळीत जगत राहिली. पण प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता जयराम.