-
अंतरंग
0आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. प्रसाद मोडक हे पर्यावरण क्षेत्रात गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. कामानिमित्ताने डॉ. मोडकांची जगभर भ्रमंती चालू असते. त्यातून त्यांना आलेले काही अविस्मरणीय अनुभव आणि त्यातून उदभवलेले काही चिंतन या ‘अंतरंग’ मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
-
ते दोन क्षणसुद्धा
0‘मी गौरी!! आयुष्यातील पहिली बारा वर्ष माझ्या गावात/घरात राहून आज मी मुंबईला आले आहे. थोडीशी भिती आणि खूपशी स्वप्न घेऊन! मला तुमच्याशी काहीसं बोलायचंय!’ गौरी आनंद पाटील यांच्या पुस्तकाची ही अर्पणपत्रिका खूप काही सांगून जाते. एका मनस्वी मुलीशी ओळख होते.
तिचे लेखन पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले असले, तरी ते पहायला ती या जगात नाही. तिने लिहिलेल्या तिच्या डायरीची ही पाने आहेत. ‘आयुष्य सुंदर आहे, आणि मी ते अजून सुंदर बनविणार,’ हा विचार घेऊनच तिने तिच्या वाट्याला आलेले अल्प आयुष्य सुंदर केले. या वाटचालीत तिला भेटलेली माणसे आणि पुस्तके, तिच्या मनात आलेले विचार तिने शब्दबद्ध केले आहेत.
-
पेंच : मोगली आणि जंगलबुकचं अरण्य
0लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रुडयार्ड किपलिंग लिखित ‘जंगलबुक’ पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी आहे. इथे आजही मोगलीचे सवंगडी शेरखान, भालू, कबाकी, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. अतुल धामणकर यांच्या अनेक थरारक अरण्य अनुभवांनी आणि ओघवत्या शैलीतील लेखनाने नटलेलं हे एका जंगलाचं जणू आत्मचरित्रच आहे.
-
मार्गस्थ
0अभिव्यक्ती हा समान धागा १४ विद्या ६४ कला असतो, तसेच अभिनयापासून लेखनापर्यंत कोणत्याही माध्यमातून व्यक्त होता येते अशी ही उत्स्फूर्त आणि प्रबळ उर्मीच असते. साहित्य निर्मितीत डोकावणं हा सर्जनशील माणसानं आपलेच संदर्भ तपासून पाहण्याचा एक प्रकार असतो. ‘डॉ. गुरुनाथ पंडित’ यांनी आपलं आयुष्य, आपला भवताल आणि भाषेपासून संवेदना पर्यंत झालेले संस्कार या साऱ्यांचे संदर्भ तपासून पाहून जगण्यात डोकावण्यासाठी केलेली कृती म्हणजेच ‘मार्गस्थ’ ही त्यांची साहित्यकृती.
-
शेखर अन् वैभवशाली मधली गल्ली
0डॉक्टर मधुकर बी. राऊत मार्ग, शिवाजी पार्क येथील मधली गल्ली. ह्या गल्लीला ‘वैभवशाली गल्ली’ म्हणण्याचे एकमेव कारण म्हणजे ह्या गल्लीतील एकापेक्षा एक अनमोल हिरे म्हणजेच ह्या गल्लीत राहून गेलेले किंवा अजूनही वास्तव्यात असलेले समाजातल्या विविध क्षेत्रांतील नावारूपाला आलेली असामान्य व्यक्तिमत्त्व की ज्यांच्या सान्निध्याने, संस्कारांमुळे, आचाराने, विचाराने पुढील अनेक पिढ्या घडल्या.
-
शेखरची प्रभा अन वल्ली
0‘शेखरची प्रभावळ’ ह्या लेखसंग्रहाप्रमाणेच हा लेखसंग्रह प्रकाशित करण्याच्या उद्देश अर्थार्जन नसून येणाऱ्या सर्व रकमेतून कर्करोगपीडितांना मदत करण्याचा आहे. ‘शेखरची प्रभा अन वल्ली’ या लेखसंग्रहात एकूण ५० लेख आहेत. यात परिचयाच्या व जवळच्या मंडळींची व्यक्तिचित्रणे आहेत, युगपुरुषांच्या भेटीत आलेल्या सुखद आठवणी आहेत, लेख अनुभवांवर आणि आठवणींवर आधारित आहेत.
-
शेखरची प्रभावळ
0लेखकाने त्याचा शिवाजी पार्कचा परिसर, डॉक्टर एम. बी. राऊत रोड, बालमोहन विद्यामंदिर तसेच जवळपासची खाद्यगृहे आणि लहानपणापासून त्याच्या संपर्कात आलेल्या आदर्श व्यक्ती, गल्लीतील लहानपणाची धमाल, फेरीवाले, विक्रेते ह्यांचे व्यक्तिचित्रण, जुन्या म्हणजेच १९६२-१९९० या कालखंडातील आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश्य जुन्या आठवणी पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात हा असून पुस्तक विक्रीतून जमा होणारा पैसा हा कर्करोगावर संशोधन करणार्या व्यक्ती किंवा संस्था आणि कर्करोगपीडितांना देण्याचा मानस आहे.
-
सावित्रीच्या लेकी
0स्त्रीने ठरवलं तर ती कोणत्याही विषयाचा अभ्यास करून त्यात पारंगत होऊन स्वतःची जागा निर्माण करू शकते. अशाच काही होतकरू आणि आपापल्या विषयात पारंगत असणाऱ्या स्त्रिया ज्यांनी यशाची शिखरे पार केली आहेत यांची माहिती असणारे हे पुस्तक. ज्यात डॉ. विजया वाड यांच्यासोबत १७ लेखकांनी यात आपले योगदान दिले आहे.
-
स्मृती पर्णे
0भवतालाचे भान आणि निरीक्षण यांच्या मिलाफातून टिपलेली स्पंदने स्मृतींच्या रूपात बहुतेकांच्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. समाज माध्यमांवरील लेखन-प्रपंचातून पुष्कराज चव्हाण यांची ही स्मृती पर्णे अनेकांसाठी त्यांच्या आठवणींचा आरसाच म्हणायचा !
-
हसरे बाण
0घटना – प्रसंग तसे साधे …
नेहमीच्याच जीवनातले …
आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही…पण तेच सारं सुरेश खरे यांच्या मिश्किल, हसऱ्या, उपरोधिक, व्यंगभेदक नजरेतून वेगळं रुप घेतं. सुलू, तात्या, नाना, बंटी अशा विविध पात्रांच्या संवादांतून, प्रतिक्रियांमधून व्यक्त होतं.
वाचल्यावर आपल्या मनात उमटतं, ‘अरे, हेच तर माझ्या मनात होतं… ‘ किंवा ‘अगदी खरं आहे, असंच असतं हे’ अथवा ‘असंही असत नाही !’ हे खरे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. हे लेखन आपल्याला गुदगुल्या करतं. सुखद हसवत… निखळ आनंद देतानाच अंतर्मुखही करतं… विचार करायला लावतं… म्हणूनच हे ‘हसरे बाण’ जिव्हारी लागत नाहीत, जिव्हाळ्याचे होतात…