-
कल्लोळतीर्थ
0“वाहत्या काळानेही बांधून टाकता येत नाहीत, अशी कलाकृती आकाराला येते, तेव्हा त्यामागे अभ्यास असतो; तंत्र असतं; एक ठोस शास्त्र असतं. पण त्याही पलीकडे काहीतरी भक्कम कारण असतं. त्या कारणाशी पोहोचता यायला हवं.” “हे अव्याहत चक्र आहे. नवीन उगवतच राहतं प्रत्येक काळात.” “हे गरजेचं नाहीच की निर्माणाच्या काळात त्याचा उद्देश कळेल किंवा पोहचेल सर्वांपर्यंत, जन्म ते अर्थ यामध्ये कदाचित हजारो वर्षांचं अंतर असेल. या हजारो वर्षांनी एखाद्या अवलियाची वाटच पाहिलेली असते रे, जो जगाला सांगणार असतो, निर्माणामागचा उद्देश !”
-
जॉन मार्शल – एक असामान्य पुरातत्वज्ञ
0जॉन मार्शल ह्याने भारतातील पुरातन वस्तू आणि वास्तू ह्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला आणि त्यांच्याबद्दल संशोधन केले. त्यांची दुरुस्ती, जीर्णोद्धार, देखभाल व जतन करण्यासाठी त्याने शास्त्रोक्त पद्धतीचा महत्त्वपूर्ण पाया घातला. आपण केलेल्या उत्खनन आणि शोधाच्या आधारावर त्याने सिद्ध केले की भारताचा ज्ञात इतिहास ख्रिस्तपूर्व किमान ३००० वर्षांइतका पुरातन आहे. त्याने उत्खननासाठी निवडलेल्या प्रत्येक ठिकाणी, भारताच्या पुरातनतेचे पुरावे प्रचंड प्रमाणावर सापडले. त्यामुळे भारताचा इतिहास उलगडणे शक्य झाले.
-
दुस्तर अफगाणिस्तान
0ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स म्हणजेच साम्राज्यांची दफनभूमी म्हणून ख्यात असलेल्या अफगाणिस्तानचा प्रदीर्घ इतिहास मोठा उलथापालथीचा आणि जटिल आहे. अफगाणिस्तानचं गेल्या शतकभराचं राजकारण प्रक्षुब्ध आणि रक्तरंजित राहिलं आहे. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालखंडातल्या अफगाणिस्तानातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून प्रस्तुतच पुस्तक दुस्तर अफगाणिस्तान म्हणजे गेल्या शंभर- सव्वाशे वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून – घटना आणि संकल्पना या दोहोंतून घेतलेला वेध आहे.
-
मुसलमानी मुलखांतील मुशाफरी
0१९३१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मुसलमानी मुलखातली मुशाफरी या पुस्तकाचं १९५० मध्ये पुनर्मुद्रण झालं. श्री. रा. टिकेकर डिसेंबर १९२८ ते जुलै १९२९ या काळात पाच-सहा महिने पुण्याच्या ‘केसरी’चे प्रवासी प्रतिनिधी म्हणून मुसलमानी मुलखात फिरत होते. या मुशाफरीत समाविष्ट आहेत पेशावर आणि क्वेट्टा; इराकमधील बसरा आणि बगदाद तर इराणमधील आबादान आणि तेहरान. मुसलमानी मुलखातील मुशाफरी केवळ प्रवासवर्णन नसून ऐतिहासिक-सामाजिक दस्तावेजच आहे. आज हे पुस्तक दुर्मीळ आहे. म्हणूनच नवीन आवृत्तीचा प्रपंच.
-
यांनी इतिहास घडविला
0इतिहास घडविणारा महापुरुष हा त्याच्या कालखंडातील सामाजिक परिवर्तनाचा परिणाम असतो. तो आपल्या कालखंडात आपल्या विचारांस धरून परिस्थितीप्रमाणे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. अशा इतिहास घडविणार्या राष्ट्रीय नेत्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे.
- लाला लजपतराय
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- चित्तरंजन दास
- महात्मा गांधी
- मोहम्मदअली जीना
-
शिवछत्रपतींचे दुर्गस्थापत्य
0शिवछत्रपतींच्या दुर्गांचे परिपूर्ण दृष्य, त्यांची भव्यता, वैभव, भक्कम संरक्षण क्षमता, इतिहास, स्थापत्यकला, बांधणीची विविधता अशा विषयांचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला उपयुक्त ग्रंथ. स्वराज्यातील दुर्गांबरोबर इतर राजवटीतील दुर्गांच्या स्थापत्याचे अस्सल साधनांच्या आधारे डॉ. केदार फाळके यांनी केलेले सखोल संशोधन. स्वराज्याच्या दोन राजधान्यांचा आणि राजधानीच्या स्थलांतराचा घेतलेला आढावा. दुर्गांच्या संवर्धनाकरिता उपयुक्त उदाहरणे म्हणून जागतिक वारसास्थळांची केलेली चर्चा.