Description
रंगीबिरंगी पक्षी हे जीवसृष्टीचे वैभव आहे. त्यांची दुनिया वेगळीचं असून, त्याचे निरीक्षण करुन सखोल अभ्यास करण्याचा आगळा छंद अतुल धामणकर यांनी जोपासला आहे. यातील एक पक्षी म्हणजे शबल खंड्या. या पक्षाचा संपूर्ण अभ्यास करुन त्याचा परिचय त्यांनी ‘शबल खंड्याचं विश्व’मधून करुन दिला आहे.
हा खंड्या काळा – पांढरा असतो. पाण्याच्या वर एकाच जागी उडत राहून मासे हेरून बुडी मारुन तो धरणे ही त्याची खासियत असल्याचे ते सांगतात. चंद्रपूरपासून जवळ असणारी इरई नदी हा शबल खंड्याच्या अभ्यासासाठी आदर्श असल्याने येथेचं धामणकर यांनी त्याच्या घरट्याचे केलेले निरीक्षण यात नोंदविले आहे.
त्याची शरीर रचना, नर व मादीतील फरक कसा ओळखावा, त्याचा अधिवास, खाद्य, उपजाती, विविध प्रांतांतील त्याची नावे, खंड्याच्या बारा जाती, त्यांचा संसार, विणीचा हंगाम, अंडी, पिले, शबलचे विविध आवाज त्याची अगदी बारीकसारीक माहिती ओघवत्या भाषेत दिली आहे. पक्ष्यांच्या अभ्यासाची पद्धत, इरई नदी व जुनोना तलाव परिसर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील अन्य पशुपक्षी यांचेही दर्शन शब्दांमधून व छायाचित्रांमधून घडविले आहे.
Pages: 200
Language: Marathi
Binding: Perfect
ISBN: 9789385311031
Size: 5.5″ x 8.5″
Reviews
There are no reviews yet.