Description
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅसकॅामच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा असणारे व ‘टीआयई मुंबई’चे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता यांच्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेला माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योगाने प्रचंड पाठबळ दिले आहे असे ठामपणे प्रतिपादन केलेल्या “The Maverick Effect’ या इंग्रजी पुस्तकाच्या ‘अतुलनीय’ या मराठी आवृत्तीचे ‘टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट’ येथे प्रकाशन केले.
साधारण ९०च्या दशकामध्ये पहिल्यांदाच ऐकू येऊ लागलेला माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय थोड्याच काळामध्ये संपूर्ण जगाला व्यापून टाकेल असे त्या वेळी नुकतेच शालेय जीवन पार केलेल्या आमच्यासारख्यांना अजिबातच वाटले नव्हते. आजही आपल्या देशात याबद्दल कुतूहल अधिक आणि ओळख कमी अशीच काहीशी परिस्थिती आहे.
असे असले तरी क्रिकेटसोबतच बिझनेसमधल्या वेगवेगळ्या संधींचे अनुभव घेताना आणि नंतर भारतीय संसदेमध्ये खासदार म्हणून कार्य करताना मला आपल्या देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा अब्जावधी रुपयांच्या उत्पन्नाचा आणि लक्षावधी लोकांसाठीच्या रोजगारनिर्मितीचा आवाका समजला आणि त्याच वेळी एका अर्थी आयटी क्षेत्रातील क्रांती घडवण्याला कारणीभूत ठरलेल्या नॅसकॉम या संस्थेची माहिती मिळाली. या नॅसकॉमच्या स्थापनेमध्ये आणि तिच्या माध्यमातून घडलेल्या या जगड्व्याळ कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे श्री. हरीश मेहतांचा !.
श्री. हरीश मेहता स्वतः उद्योजक असूनही ते स्वहितापेक्षा त्यांच्या आवडत्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या भारतातील विकासासाठी अमेरिकेतील यशस्वी कारकीर्द बाजूला ठेवून भारतात परतले. त्यांची ही संपूर्ण वाटचाल त्यांनी त्यांचे मूळ इंग्लिश पुस्तक ‘The Maverick Effect’ यामध्ये वर्णन केलेली आहे. याच पुस्तकाचा ‘अतुलनीय’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित होत आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल आणि त्या क्षेत्रातील भारतीय कंपन्यांच्या देदीप्यमान कार्याबद्दल कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांसाठी हा एक उत्कृष्ट अनुभव असेल, याची मला खात्री आहे.
– भारतरत्न सचिन तेंडुलकर
Pages: 312
Language: Marathi
Binding: Hardcover
Size: 24.5 x 16.5 x 2 cm
Reviews
There are no reviews yet.