पुस्तक प्रकाशन सोहळा
आला मनात श्रावण
मन आणि निसर्ग. दोन्हीची रूपं क्षणाक्षणाला बदलणारी. बदलाचे सातत्य तरीही सूत्र सांभाळणारी. यांच्याच सहचर्याने जगणं चालतं. कधी एकमेकांवर परिणाम करीत, कधी एकमेकांना सामावून घेत. मनात साठलेली निसर्गाची रूपं अलवार शब्दांत उलगडतात. भावनांच्या हजार रंगांचे चित्र शब्दांत उमटविण्याचा छंद लागतो. चाकोरीतल्या जीवनाचा वेध घेताना देखील आभाळाची आस लागते, साध्या सरळ मनाचा ठाव शोधणार्या शब्दांना.
लेखिका : माधुरी शेखर




